जिल्हा परिषद ठाणे येथे आपले हार्दिक स्वागत आहे! कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) हे कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक अनोखे साधन आहे,
जे सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात मदत करते आणि सामाजिक कल्याणासाठी हातभार लावते. CSR उपक्रम पारंपारिक शासकीय प्रक्रिया टाळून, प्रत्यक्ष जमिनीवर
अंमलबजावणी करून समाजाच्या विकासाला चालना देऊ शकतात. स्वातंत्र्यानंतर भारताने विकासाच्या दिशेने मोठी मजल मारली आहे. मात्र, जर भारताने प्रत्येक नागरिकाचा
कल्याणाचा विचार केला, तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्राने हातात हात घालून एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रामध्ये सामाजिक प्रकल्प प्रभावीपणे
राबवण्याची कौशल्ये आणि शिस्त आहे, आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्र एकत्र आले तर कोणतेही आव्हान पेलू शकतात. अशा सहकार्याने शाश्वत सामाजिक कल्याण लवकरात लवकर
साध्य करता येईल, असा माझा ठाम विश्वास आहे.
मला आनंद आहे की आम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेल (CSR Cell) स्थापन करत आहोत,
जे खासगी क्षेत्रातील संस्थांसाठी एक सहयोगात्मक व्यासपीठ प्रदान करेल. हे व्यासपीठ जिल्हा परिषद ठाणेच्या विविध विभागांसोबत प्रभावी समन्वय साधण्यास मदत करेल
आणि प्रक्रिया सुलभ करेल. त्यामुळे मी सर्व खाजगी संस्थांना या व्यासपीठाचा उपयोग करून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी उपक्रम आणि कार्यक्रम हाती
घेण्याचे आवाहन करतो. धन्यवाद!